Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[पोलीस] मराठी निबंध Essay on police in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.


पोलीस

Essay on police in marathi

पोलीस म्हणजे सरकारी समाजसेवक. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत करतात. दिवसरात्र आपले संरक्षण करतात. पोलिसांचा गणवेश खाकी असतो. खांद्यावर असणार्या बिल्ल्यांमुळे त्याचे पोलीस यंत्रणेतील स्थान समजते. पदोन्नती कळते. त्याच्या हातात एक काठी असते. आपण त्यांना वाहतुकीच्या किंवा रहदारीच्या नाक्यावर पाहतो. पोलिसांना अनेक प्रकारची कामे असतात. चोऱ्या, दरोडे, दंगेधोपे तसेच खुनाची उकल करणे, चोरांना पकडून शिक्षा होईपर्यंत तसेच गुन्हेगारांना कोर्टात घेऊन येणे-नेणे हे काम सुद्धा पोलिसांना करावे लागते.

अतिरेकी कारवायांचा बंदोबस्त करणे. अपघात किंवा जाळपोळ होवू नये म्हणून नियंत्रण ठेवणे. मंत्र्यांच्या भेटी दरम्यान बंदोबस्त ठेवणे. त्यांचा अंगरक्षक म्हणून सेवा बजावणे. यामुळे चोवीस तास अखंड कार्यरत असल्याने पोलिसांवर कामाचा खूप ताण असतो. त्यांचे कुटुंबही त्यांच्या या सेवेत तितकेच योगदान देतात. कामावरुन घरी आल्यावर त्यांना त्रास होऊ न देणे याची जबाबदारी कुटुंबावर असते.

प्रत्येक सणाच्या दिवशी मिरवणुकींचा बंदोबस्त करताना पोलिसांना दिवसरात्र सावध रहावे लागते. त्यातही कितीतरी वेळा त्यांच्या जीवावरही बेतते. पण समाजाला मैत्रीचा हात देत त्यांना आपले काम करावेच लागते. समाजात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तसेच देशातील कायद्याचे पालन होण्यासाठी पोलिसांची जबाबदारी खूप मोठी असते. अपुरा पगार, कामाचे तास, राहण्यासाठी चांगल्या घरांची वानवा असे असूनही रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या अशा या समाजसेवकाला

आमचा सलाम.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा