Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[UPDATED]बालपण मराठी निबंध balapan essay in marathi

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.


निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

बालपण -

बालपण

'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' 

अशी इच्छा सर्व मोठ्या माणसांना होत असते. बालपणीचा आनंद निरागस आणि निष्पाप असतो. लहानपणी वेगळीच मजा असते. तिथे भूत भविष्याची फिकीर नसते. कसल्याच काळज्या, जबाबदान्या नसतात. खावे, प्यावे आणि मोकळ्या रानी पाडसासारखे मुक्त हुंदडावे. कोणाची भिती नाही. शाळेत जाणे नाही की गुरुजींच्या हातचा मार खाणे नाही. वाऱ्यासारखे फुलपाखरी आयुष्य ज्याला कुठेही अडथळा नाही. लहानपणी पाहिलेली, अनुभवलेली प्रत्येक गोष्ट नव्या नवलाईची असते त्यात वेळेचे भान आणि काळाची जाण नसते. काहीही करा, हसा, खेळा, बागडा, रुसा, बडबडा नाहीतर खुशाल लोळा. जातायेता सर्वांनी पापा घ्यावा नाहीतर प्रेमाने कुरवाळावे.

लहानपणी जग काही वेगळेच असते तिथे परिराणीचे राज्य असते. चॉकलेटचे बंगले आणि त्या बंगल्यांना गोळ्या-बिस्किटांची दारे खिडक्या असतात. चांदोमामा आणि चांदण्या सख्याप्रमाणे खेळायला असतात. आकाशाच्या अंगणात कितीही धुडगुस घातला तरी कोणीही ओरडत नाही. छोटेसे काम केले तरी कौतुक आणि बक्षिसांची खैरात असते.

बालपण म्हणजे अवखळ वाहणारा निर्मळ झरा, जिथले पाणी कधीच प्रदूषित होत नसते. हा झरा बारमाही खळखळ वाहता असतो. जीवनातील वसंत ऋतू आणि कोकिळेचे गुंजन म्हणजे बालपण. यात मनमयूर सतत फुललेला असतो. बालपणात मान, अपमान, निंदा, प्रशंसा, दारिद्र्य यांचे सावट नसते. आईच्या उबदार पदराखाली झाकलेलं जीवन म्हणजे बालपण. लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी. या कोन्या, पाटीवर पहिलीच अक्षरे उमटतात ती म्हणजे 'आई'. आई हीच बालकाची पहिली गुरु असते. तीच आपल्या बाळाला जीवनात वागण्याचे, संस्कारांचे पहिले धडे देते, आईचे बोट धरुन चालायला शिकलेले मूल सदाचाराचे आणि सद्वर्तनाचे धडे घेते. जगात आपला ठसा उमटवण्यासाठी मुलाला त्याची आई बालपणीच शिधा देते. तोच शिधा त्याला पुढे जीवनभर पुरतो.

बालपणीचा दुसरा गुरु म्हणजे शिक्षक, त्याचे केंद्र म्हणजे शाळा. जीवनाची नौका ऐलतीरावरुन पैलतीरावर नेण्यासाठी समर्थ बनवणारे शिक्षक बालकाला विद्वत्ता बहाल करुन विविध विषयांत पारंगत करतात. संकट आणि अडचणींचा सामना करण्याचे ज्ञान देतात. गुरु आपल्या सदाचाराने त्याला संस्कारित करतात. आपल्या पायावर उभा राहण्यासाठी सक्षम करतात तेव्हा त्याचे बालपण संपते.

तुम्ही वरील निबंध या विषयांवर वापरू शकता

  • लहानपण देगा देवा मराठी निबंध
  • रम्य ते बालपण
  • लहानपण मराठी निबंध


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा